मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधताना ते बोलत होते.मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे.१० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रोजेक्ट आहे त्यापैकी ७५ हजार युवकांना आज नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.महाराष्ट्रातही आम्ही ठरवले आहे की ७५ हजार तरूणांना नोकऱ्या द्यायच्या.त्याच पार्श्वभूमीवर १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात आम्ही आठवड्याभरात काढणार आहोत.सर्वच विभागातील जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्ती पत्र देणार आहेत.बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात.त्यामुळे या नोकर भरतीद्वारे मोदी सरकार विरोधकांना प्रत्युत्तर देईल.आज मोदी युवकांशी संवाद साधतील.यादरम्यान संरक्षण मंत्रालय,रेल्वे मंत्रालय,पोस्ट विभाग,गृह मंत्रालय,कामगार आणि रोजगार मंत्रालय, सिआयएसएफ, सिबीआय,कस्टम,बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील.