चोरावर मोर !! शिर्डी येथील फायन्सास कंपनीकडून ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणात “कुंपणच शेत खातय” प्रकार उघडकीस !! अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती !!
अहिल्यानगर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ जुलै २५ मंगळवार
ग्रो मोअर इन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनी शिर्डी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देता असे अमीष दाखवून व फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीची एकुण ८ लाख रुपयांची फसवणुक करुन ते पसार झाले आहे वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन राहाता पो.स्टे.गु.र.नं.२७३/२०२५ वी.एन.एस.२०२३ चे कलम ३१८ (२).३१८(४),३१६(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.सदर गुन्हयाच्या तपासात आरोपी नामे भुपेंद्र राजाराम सावळे वय २७ वर्षे रा.नांदुर्खी रोड,साईभक्ती भुषण निवास,श्रीकृष्णनगर,शिर्डी ता. राहाता जि.अहिल्यानगर याचेकडे सदर तपासाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने शेअर मार्केटच्या चढ उतारामध्ये मोठया प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे वापस करु शकलो नाही.
दरम्यान त्याच्या कडील जनतेच्या ठेवी व परतावाबाबत माहिती विचारले असता त्याने सांगितले की,दि १५/०१/२०२५ रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई धाकराव व त्याच्या सोबतच्या तीन पोलीस कर्मचारी यांनी मी,माझे दोन भाऊ व मित्र असे नाशिककडे फॉर्च्यूनर गाडीने जात असतांना लोणीजवळ अडवुन म्हणाले तुझ्याकडे कोणतेही आरबीआयचे लायसन्स नसतांना जनतेकडुन पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो.मी त्यांना माझ्यावर कोणतीही कार्यवाही करु नका मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही,मला विनाकारण कोणत्याही खोटया गुन्हयात अडकवुन नका.त्यावर ते व त्यांचे सोबतचे कर्मचारी मला म्हणाले तुला जर यातुन सुटायचे असेल तर तु आंम्हाला १ कोटी ५० लाख रुपये नगद स्वरुपात दे त्यावर मी धाकराव साहेब व सोबतच्या कर्मचारी यांना माझ्याकडे नगद स्वरुपात पैसे नाहीत,मी नगद पैसे देवु शकत नाही असे म्हणालो.त्यांनतर धाकराव साहेब व सोबतच्या पोलीसांनी मला व माझे सोबतचे माझे २ भाऊ व मित्र यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवारातील पार्कीगमध्ये घेवून आले.तेथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी मला ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये दया असे सांगितले त्यावर विनाकारण एखादया खोटया गुन्हयात अडकण्यापेक्षा पोसई धाकराव साहेंबांनी सांगीतले प्रमाणे त्यांनी दिलेल्या अकाउंटवर मी ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले आहे अशी आरोपीने माहिती दिली असता त्याबाबत सदर तपासादरम्यान चौकशी केली असता पोसई धाकराव व त्यांचे सोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शनी दिसुन आले आहे. सदर बाबत तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरुन आज दिनांक २१.०७.२०२५ रोजी पो.स.ई.तुषार छबुराव धाकराव व पोलीस अंमलदार पो.हे.कॉ.२१४५ मनोहर सिताराम गोसावी,पो.हे.कॉ.४८६ बापुसाहेब रावसाहेब फोलाणे,पो.हे.कॉ.१२९३ गणेश प्रभाकर भिंगारदे सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना शासन सेवेतून निलंबीत करण्यात आले असुन सदर बाबतची प्राथमिक चौकशी सुरु करण्यात येवुन प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे नेमणुक आर्थिक गुन्हे शाखा यांचेकडे देण्यात आली आहे असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रेसनोट मध्ये नमूद करण्यात आले आहे.