महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२३ जुलै २५ बुधवार
महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि अविरत कार्यरत मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.२२ जुलै मंगळवार रोजी चोपडा येथे शहर आणि ग्रामीण पूर्व-पश्चीम मंडळाच्या वतीने एकत्रित रित्या ‘महारक्तदान शिबीरा’चे आयोजन करण्यात आले.प्रसंगी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष(पूर्व) मा श्री चंद्रकांतजी बावीस्कर हे उपस्थित होते.
सदरील महारक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा महामंत्री राकेश पाटील,शहराध्यक्ष नरेंद्र पाटील,चोपडा ग्रामीण (पूर्व मंडलाध्यक्ष) अध्यक्ष पिंटू पावरा,चोपडा ग्रामीण (पश्चिम मंडलाध्यक्ष) कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे हरीश माळी,सचिन बिरारी,अशोक शिंपी,देवदत्त वैद्य,सुनील सोनगीरे,विशाल भोई यांनी परिश्रम घेतले.यावेळी असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करीत आपला सहभाग नोंदविला.यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.