एकाने गद्दारी केली,दुसऱ्याकडे आमदार नाही व तिसरे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व राज ठाकरे यांच्यावर टीका
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.शिवाजी पार्कवर हे तिन्ही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही चर्चा सुरु आहे.याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी तिन्ही नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दानवे म्हणाले की,मुळामध्ये या तिघांना मी मोठे का म्हणू? एकाने शिवसेनेचे ४० आमदार घेऊन गद्दारी केली,एकाचा एकही आमदार महाराष्ट्रात नाही,आणि तिसरे म्हणजे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले आहेत असे म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे,राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळे हे तिघेही एकत्र आले आहेत.समोरच्याची भीती वाटते तेव्हाच सगळे एकत्र होत असतात त्यामुळे उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या शिवसेनेच्या भीतीपोटीच सर्व एकत्र येत आहेत असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.