यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सांगवी बु!! येथील रहिवाशी व पांडुरंग किराणाचे संचालक रेवजी गानू तेली यांचे वरिष्ठ सुपुत्र श्रीराम रेवाजी तेली यांचे दि.२१ शुक्रवार रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पांडुरंग किराणाचे छत्र हरविले आहे.श्रीराम तेली यांचे वडील रेवाजी गणू तेली यांच्या निधनानंतर वरिष्ठ बंधू श्रीराम तेली यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांचे लहान बंधू राधेश्याम तेली,मनोहर तेली व कमलाकर तेली,मुले रितेश तेली व सौरभ तेली यांनी मोठ्या एकोप्याने व समजूतदारपणाने पांडुरंग किराणाची परंपरा आजपावेतो यशस्वीपणे कायम ठेवली.त्यांच्या निधनामुळे पांडुरंग किराणाशी जुडलेले ग्राहक,मित्रमंडळी,आप्तस्वकीय,नातेवाईक व गावकरी मंडळी यांच्यावर शोककळा पसरली असून त्यांच्याकडून तीव्र दुःखद संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.श्रीराम तेली हे उच्चपदवीधर असतांना देखील त्यांनी नोकरीची आशा न करता पांडुरंग किरणासोबत शेती व्यवसायाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.सर्वांशी मनमिळाऊपणे बोलण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता.प्रेमाने बोलणे त्यांच्याकडून शिकावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.त्यांच्या निधनामुळे गावभरात दुःख व्यक्त केले जात आहे.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,तीन भाऊ व नातवंडे असा मोठा परिवार आहे.श्रीराम तेली हे राधेश्याम,मनोहर व कमलाकर यांचे मोठे भाऊ व रितेश तसेच सौरभ तेली यांचे वडील होत.