Just another WordPress site

मिलींद कुरकुरे यांचा फैजपुर विभागातुन उत्कृष्ट ग्राम महसुल अधिकारी म्हणुन सन्मान !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार

येथील तहसील कार्यालय अंतर्गत तालुक्यातील दहिगाव येथे ग्राम महसुल अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले मिलिंद वासुदेव कुरकुरे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते गुणी कर्मचारी म्हणुन स्मृतीचिन्ह देवुन नुकताच गुणगौरव करण्यात आला.

जळगाव येथे आज दि १ ऑगस्ट २५ रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी,कर्मचारी गुणगौरव समारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील,राज्याचे जलसंपदामंत्री ना गिरीष महाजन,जळगावचे आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले मिलिंद वासुदेव कुरकुरे यांना यावल-रावेर तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या मधून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन गौरवविण्यात आले.प्रसंगी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील,मंत्री ना गिरीश महाजन,वस्त्रोउद्योग मंत्री ना.संजय सावकारे,आमदार राजू मामा भोळे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जळगाव जिल्हा परिषदच्या सिईओ मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.मिलिंद कुरकुरे यांचा सन्मान झाल्याबद्दल यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करीत अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.