Just another WordPress site

आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील केळी पिकावरील बुरशीजन्य रोगावर आधारित प्रशिक्षण वर्ग उत्साहात !!

केळी वरील पनामा बुरशीजन्य रोग शेत जमीनीतुन ३० वर्ष जात नाही-प्रा.विजयराज गुजर यांचे मत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०३ ऑगस्ट २५ रविवार

पनामा हा  रोग एक विनाशकारी रोग मातीतील राहणाऱ्या बुरशीच्या प्रजातीमुळे होणारी केळी फ्युझेरीयम ऑक्सीस्पोरम फार्मा स्पशलिस क्युबेन्स फ्युझेरीयम विल्टचा एक प्रकार असुन पनामा रोग संपुर्ण उष्णकटिबंधीय भागात व्यापक आहे आणी जिथ संवेदशील केळीची लागवड केली जाते तिथ या रोगाचा प्रार्दूभाव आढळून येवु शकतो याकरीता शेतकरी बांधवांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याची माहिती आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतुन संपन्न झालेल्या केळी प्रशिक्षण वर्ग या कार्यक्रमात केळीवरील एकात्मीक रोग व्यवस्थापनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.विजयराज गुजर यांनी शेतकरी बांधवांनी दिली.

दरम्यान यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतुन व केळी संशोधन केन्द्र कृषी विज्ञान केन्द्र जळगाव यांच्या माध्यमातून आयोजीत करण्यात आलेल्या केळी लागवड संदर्भातील केळी प्रशिक्षण वर्ग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी केळी लागवड व अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा विजयराज गुजर यांनी केळी पिकांवर होणाऱ्या अत्यंत धोकादायक पनामा या बुरशीजन्य रोगाबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,केळीवर फ्यूझेरियम बुरशी ही केळीच्या कोवळ्या मुळांवर किंवा मुळांच्या तळावर आक्रमण करते व बहूतेकदा जखमांधुन काही संसर्ग राईझोम ( मुळासारखे खोड ) मध्ये पसरतात त्यानंतर मुळाच्या साठयांवर आणी पानाच्या तळावर जलद आक्रमण करतो ज्या शेतातील केळी पिकांवर सर्वाधीक धोकादायक पनामा रोगाच्या प्रार्दूभावामुळे आढळुन येतो त्या शेत जमिनीच्या मातीतुन किमान तिस वर्ष ह्या रोगाचा प्रार्दूभाव जात नसल्याची माहिती गुजर यांनी दिली.या प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात केळी लागवड विषयी प्रा किरण जाधव,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापना संदर्भात प्रा.अंजली मेढे यानी शेतकरी बांधवांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,माजी कृषी बाजार समितीचे सभापती नारायण चौधरी,कृउबाचे संचालक व माजी सभापती हर्षल पाटील,खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे व सर्व संचालक यांच्यासह शेतीकरी बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.