यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ ऑगस्ट २५ सोमवार
येथील नगर परिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या सदस्य पदाचा नुकताच राजीनामा दिला असून सदरील राजीनामा त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांना सुपूर्त केला आहे.
सदरील राजीनामा पत्रात यावल नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधरे कोलते यांनी म्हटले आहे की,आपण आपल्या खाजगी कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.दरम्यान आगामी काळात राज्यात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगर परिषदच्या निवडणुक पार्श्वभुमीवर राकेश कोलते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.दरम्यान लवकरच आपण आपल्या मित्र परिवाराशी विचार विनिमय करून पुढील राजकीय वाटचाल ठरविणार असल्याचे राकेश कोलते यांनी ‘पोलीस नायक’ शी बोलतांना सांगीतले आहे.