पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
पुणे रेल्वे स्टेशनवर दिवाळीनिमित्त घरी परतत असतांना चेंगराचेंगरीत प्रवाशांनी गर्दीत तुडविल्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.सदरील घटना ही दि.२२ रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली आहे.दिवाळी निमित्त घरी जात असताना चेंगराचेंगरी दरम्यान प्रवाशांनी गर्दीतून तुडविल्यामुळे बेशुद्ध पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बौद्धा मांझी असे असून तो मूळचा बौद्धगया (बिहार) येथील रहिवासी आहे.दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे.गाडी फलाटावर आल्यावर प्रचंड गर्दी होती याचवेळी दम्याच्या त्रासाने सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अशा स्थितीत गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर दि.२२ शनिवार रोजी रात्री पुणे दानापूर एक्सप्रेसला प्रचंड गर्दी झाली होती.याच गर्दीतून गाडीमध्ये चढत असताना सदर प्रवाशाला दम्याचा त्रास झाला.त्याला रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी तात्काळ उपचारासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविला.मात्र यावेळी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.