Just another WordPress site

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिरात राखी बनवा कार्यशाळा व रक्षाबंधन उत्साहात !!

जावेद शेख,पोलीस नायक

भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-

येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बनवा कार्यशाळा संपन्न झाली.बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजलेली असताना स्वतः राखी बनवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.राखी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोरा,रंगीत मनी, रंगीत कार्डशिट,रंगीबेरंगी टिकल्या,कैची,फेविकॉल इत्यादी साहित्य वापरले.विद्यार्थ्यांनी स्वतःची सर्जनशीलता वापरून नाविन्यपूर्ण राख्या बनवल्या.अत्यंत सुरेख आकर्षक अशा राख्या विद्यार्थ्यांनी बनवल्या.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांच्या साह्याने रक्षाबंधन सण शाळेत साजरा केला गेला.

दरम्यान रक्षाबंधन सणाचे महत्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजावुन सांगितले.श्रीमती अनिता सैंदाने व श्री अनंत हिरे यांनी विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला.शाळेतील श्रीमती संगीता शेलार,सुनिता देवरे,अनिता सैंदाणे,अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे,सुयोग पाटील,सचिन पाटील,हरिचंद्र पाटील,किरण पाटील व शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.