Just another WordPress site

चितोड वाणी समाज सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर !! अध्यक्षपदी महेश वाणी तर सचिवपदी प्रशांत श्रावगी यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ ऑगस्ट २५ सोमवार

येथील चितोडे वाणी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ऑनलाइन बैठक नुकतीच संपन्न झाली व त्यात सर्वानुमते खालील प्रमाणे सन २०२५-२०२६ या वर्षासाठी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.यावर्षी मंडळाचे अध्यक्ष म्हणून महेश वासुदेव वाणी यांची तर उपाध्यक्षपदी जगदीश रत्नाकर कवडीवाले,सचिव प्रशांत बाळकृष्ण श्रावगी,खजिनदार म्हणून अजय सुधाकर गडे यांची निवड करण्यात आली आहे.

या वर्षी मंडळाचे ५१ वे वर्ष असल्याने विविध सामाजिक उपक्रम,मनमोहक असे धार्मिक देखावे,धार्मिक कार्यक्रम,विद्युत रोषणाई आयोजित करण्यात येणार आहेत.सदर निवडीचे सर्व स्तरातून व समाजातून नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.मंडळाची कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे.यात अध्यक्ष महेश वासुदेव वाणी,उपाध्यक्ष जगदीश रत्नाकर कवडीवाले,सचिव प्रशांत बाळकृष्ण श्रावगी,खजिनदार अजय सुधाकर गडे,सदस्य पंकज गडे,धनंजय सराफ,आनंद कवडीवाले,सचिन बुरुजवाले,हर्षल गजऋषी,गणेश गजऋषी,वासुदेव कवडीवाले,गिरीश भार्गव,शुभम वाणी,वैभव गजऋषी,वैभव यावलकर,सिद्धेश श्रावगी,दीपेश गजऋषी,जयेश गजऋषी,प्रतीक श्रावगी,दीपक वाणी,अजय वाणी,सुरज श्रावगी,गौरव गजऋषी,अक्षय वाणी,रामचंद्र कवडीवाले,श्रीहरी गजऋषी,देवेश बुरुजवाले,सिद्धेश वाणी,रुपेश श्रावगी,अंगद यावलकर,वरद यावलकर,यज्ञेश बुरुजवाले,निषाद सराफ,कमलेश यावलकर,सिद्धेश कवडीवाले,सिद्धेश श्रावगी,अमेय सराफ व सर्व व्यास नगरी सहकारी मित्रपरिवार अशी कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.