Just another WordPress site

डोंगर कठोरा ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील गौरव प्रमाणपत्राने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कर्तव्यदक्ष ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शेत सुलभ योजना ७/१२ वरील तुकडा शेरा कमी करणे या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबद्दल त्यांना आज दि.१५ ऑगस्ट शुक्रवार रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान ग्राम महसूल अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रमा अंतर्गत ष्ट सुलभ योजना ७/१२ वरील तुकडा शेरा कमी करणे या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करून शेतकरी बांधवांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मदत केली असून सदरील योजना यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे.परिणामी त्यांच्या प्रामाणिकपणा,परिश्रम आणि समाज हिताची भावना या कार्याची दखल घेत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते आज दि १५ ऑगस्ट रोजी त्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.दरम्यान डोंगर कठोरा येथे रुजू झाल्यापासून अल्पावधीतच आपल्या प्रशासनातील प्रामाणिकतेवर भर देऊन उत्तम कार्याचा ठसा उमटवीत हे यश संपादन केले आहे.सदरहू ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांच्या कार्याच्या गौरवाबद्दल त्यांचे प्रशासनात व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.