दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख:-
रुपा-वय २५ वर्षे ही शंभर टक्के पोलिओग्रस्त आहे आणि कमरेपासून दोन्ही पायांनी निकामी असल्याने तिच्या आई-वडीलांनी तीला पंढरपूर येथील विठोबाच्या पायथ्याशी टाकून दिले होते पोलीसांनी तिच्या पालकांचा शोध घेतला पण पालक न मिळाल्याने अखेर कोर्टाचा आदेश घेवून परतवाडा येथून ८ किलोमीटर अंतरावतर असलेले वझ्झर येथील स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात आजीवन पुनर्वसनाकरता दिले.शंकरबाबांनी तिला १२वी पर्यंत शिक्षण दिले तिची रोज ने-आण करण्यासाठी बालगृहातील मंजुळा नावाची मुलगी ही स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचे संपूर्ण विधी आणि सांभाळ करते तर तिच्या शिक्षणाचा खर्च पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी केला होता.
राज्य सरकारच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिचे आधारकार्ड काढून दिले.रुपा ही १२वी पास झाल्याने पुढे तीचे काय होईल?याची चिंता बाबांना लागली होती नियमाप्रमाणे १८ वर्षांनंतर तिला बालगृहाच्या बाहेर काढणे जरुरी होते. योगायोगाने अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पवनित कौर ह्या संस्थेमध्ये पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.माझ्या रुपाला कोणतीही नोकरी देवून जीवनदान द्या अशी विनंती शंकरबाबांनी तेव्हा केली होती यानंतर त्यांनी ताबडतोब अचलपूरचे उपजिल्हाधकारी संदीपकुमार अपार यांना बोलावून घेतले.रुपाला अचलपूर नगरपरीषदेत तातपुरत्या स्वरुपाची कंत्राट बेसवर नोकरी लावून द्या अशी सूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली यानंतर अपार यांनी क्षणाचाही विलंब न लावता अचलपूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना ही बाब कळविली तेव्हा नगर परिषद अचलपूर येथील आरोग्य विभागात लिहण्याचे काम तिला देण्यात आले.