Just another WordPress site

अनवरदे खुर्द येथे शिवशंभो गणेश बाल मित्र मंडळतर्फे गणेश विसर्जन उत्साहात !!

महेश बोरसे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार

तालुक्यातील अनवरदे खुर्द येथे शिवशंभो गणेश बाल मित्र मंडळातर्फे बसविण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन काल दि.५ सप्टेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात  आले.यानिमित्ताने मंडळाच्या बालगोपाळांनी आपल्या थोड्याशा तुटपुंजीतूनच गणेश स्थापना पासून विसर्जनापर्यंचा खर्च तसेच महाप्रसादाचा खर्च केल्यामुळे या बालगोपाळांचे गावभरातून कौतुक केले जात आहे.

दरम्यान शिवशंभो गणेश बाल मित्र मंडळातर्फे गणपती बाप्पाला बसवितांना त्यांच्याकडे पैशांची कमतरता भासली.सदरहू या बाळगोपाळांना पैशांची कमतरता भासत असतांना गणेश स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत मोठी काटकसर करून व विसर्जनासाठी अवाजवी डिजे व ब्यांडचा खर्च टाळून गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या आनंदाच्या वातावरणात करण्यात आले.एव्हडेच नव्हे तर समस्त गणेश भक्तांना महाप्रसादाचे आयोजन या चिमुकल्या बालगोपाळांच्या वतीने करण्यात आले सदरहू या बालगोपाळांचे परिसरात कौतुक होत आहे.तसेच सदरील बाळगोपाळांना पुढील वर्षी गणपती बाप्पाच्या स्थापनेस पुन्हा नवचैतन्य व उत्साह निर्माण व्हावा यासाठी महेश बोरसे पोलीस नायक चोपडा तालुका प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ विजय सुभाषराव बोरसे,रवींद्र युवराज बोरसे,धनंजय साळुंखे,नाना गुरुजी तिरमले,युवराज आनंदा बोरसे यांच्या वतीने पुढील वर्षी गणेश मंडळाच्या मिरवणुकीला डीजे लावून देण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली असल्यामुळे सदरील मंडळाच्या  बालगोपाळांच्या आनंदाला जणू उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.