यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार
जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाची वार्षीक सभा यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात नुकतीच घेण्यात आली व या बैठकीत नवीन नियुक्त्या घोषित करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यात तालुक्यातील शिरसाड येथील सामाजीक कार्यकर्ते आर.ई.पाटील (ह.मु.किनगाव) यांची मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील,नाशिक विभागीय अध्यक्ष रामदादा पवार,विभागीय उपाध्यक्ष सुमित पाटील व जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान आर.ई.पाटील यांनी सन २००५ ते २०१० या कालावधीत मराठा सेवा संघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी सेवा दिली आहे व त्यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे.यावेळी यावल तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,तेजस पाटील,नायगाव माजी सरपंच एल.व्हि.पाटील,अँड.देवकांत पाटील,सुनील गावडे,बापू जासूद,प्रमोद पाटील,योगेश पाटील (किनगाव),महेश पाटील (उंटावद),समाधान पाटील,कृष्णा पाटील (दहिगाव),उद्योग कक्षाचे स्वप्निल बोरसे,एम.पी.चव्हाण,जिजाबराव पाटील (सावखेडा) रवींद्र टोंगळे इ.सह राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील समाज बांधव उपस्थित होते.