Just another WordPress site

यावल येथील सहा वर्षीय बालकाच्या खुनात गुन्ह्यात लैंगींक अत्याचार झाल्याने पॉस्को कायदा कलमची वाढ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० सप्टेंबर २५ बुधवार

शहरातील सहा वर्षे बालकाची जाळून हत्या करण्यात आली होती व या संदर्भात आरोपीला आठ दिवस पोलीस कोठडी मिळाल्याने आता आरोपी पोपटासारखा बोलायला लागला असून या खुनाच्या गुन्ह्यात इतर कलमांसह आता बाललैंगिक अत्याचाराचे कलम “पोस्को ” या कलमाची वाढ करण्यात आली आहे.यावल शहरात घडलेल्या या संतापजनक घटनेचा पोलीस तपास करीत असून आणखी पुढे यात काही आरोपी वाढतात का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागुन आहे.

दरम्यान दि.५ सप्टेंबर रोजी बाबुजीपुरा भागातील सहा वर्षीय गोंडस मुलगा बेपत्ता झाला होता व ईद ए मिलादच्या सण आणि या सणावर मुलगा बेपत्ता झाल्यामुळे पूर्ण परिवारासह वाड्यात या सणावर संध्याकाळी विरजण पडले.दि.६ सप्टेंबर रोजी सदर बालकाचा मृतदेह शेजारी राहणाऱ्याच्या संशयीत आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याच्या घरात जळालेल्या मृतअवस्थेत मिळून आला होता. सदरची ही धक्कादायक खबर वाऱ्याप्रमाणे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पसरली व समाज बांधवांचे शहरवासीय आणि नातेवाईक यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.पोलिसांना सदरच्या घटनेचे गांर्भीयाने घेत व समय सुचकता बाळगुन योग्यरित्या हाताळनी केली.या संदर्भात मयताचे आजोबा ७४ वर्षीय यांनी संशयित आरोपी विरूद्ध फिर्याद दिल्याने शेख शाहिद शेख बिस्मिल्ला वय २२ या संशयिता विषयी खुनाचा गुन्हा दाखल कण्यात आला होता व त्यानुसार यावल पोलिसांनी पुढील कारवाई केली.सदर आरोपीला यावल न्यायालयात उभे केले असता आरोपीस दि.१५सप्टेंबर पर्यंत ८ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाल्याने तपासाला चालना मिळाली आहे.पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख व सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली.यावलच्या ग्रामीण रुग्णालयात बालकाचे शवविच्छेदन झालेले होते व त्याचे आलेले अहवाला अनुसार आरोपीच्या तपासामध्ये चक्र फिरलीत व त्यात पोस्को अंतर्गत अनैसर्गिक संबंधातून सदरचा खून झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.या घटनेची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास आणखी काही आरोपी वाढतात का असे प्रश्न समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.