Just another WordPress site

“यावल तालुक्यात १७ सप्टेंबर २५ पासून महसुल विभागाच्या वतीने सेवा पंधरवाडा” !! तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार

महसूल विभागाचे वतीने १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २५ या कालावधीत सेवा पंधरवाडा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महसूल विभागाच्या वतीने या पंधरवाड्याचे तीन टप्प्यात विभाजन करण्यात येणार आहे व त्यात विविध विषय व योजना समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान राज्य शासनाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २५ या कालावधीत सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांच्या विविध समस्या टप्पे निहाय सोडविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले असून त्यांनी आखलेल्या रूपरेषेनुसार सेवा पंधरवाड्यात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,नायब तहसीलदार एम बि पवार व कर्मचारी तसेच नागरिकांचे महसुली प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.यात पहिला टप्पा १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर,दुसरा टप्पा २२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा २७ सप्टेंबर ते २ आक्टोबर असा राहणार असून यात प्रथम विषय थकबाकी मुक्ती मोहीम असून यात जमीन महसूल व थकबाकी वसुली केली जाणार आहे.एक हजार रुपये वरील एक हजार ३०० थकबाकीदारांचे वसुली प्रकरणे लोक अदालतीमध्ये  ठेवले जाणार असून त्यांना तशा थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.यासह वारस नोंदणी अंतर्गत मृतांची नावे वगळणे, वारस हक्क,स्त्रीयांचे हक्क,राशन कार्ड मधील अपात्र व्यक्तींची नावे वगळणे मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच पात्र लाभार्थ्यांची नोंद करणे,शेत सुलभ योजनेअंतर्गत तुकडे बंदी कायद्यानुसार सुनावणी सातबारा अद्यावत करणे,पानंद रस्ते अंतर्गत ८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर गाव शिवार भेटी देवून पूर्वापार प्रचलित असलेले व सध्या बंद असलेले रस्ते खुले करण्याचा प्रयत्न करणे यामध्ये महसूल कर्मचारी,गाव पोलीस पाटील व महसूल सेवक यांचा सहभाग राहील.गावातील रस्त्यांची यादी करणे व ग्रामसभा घेऊन अंतिम यादी तयार करून भूमी अभिलेख विभागाकडून गाव नकाशातील रस्त्याबाबत आवश्यक त्या ठिकाणी सीमांकन करणे अतिक्रमण निष्कासित करणे ही कामे केली जाणार आहे.दफनभूमी स्मशानभूमी अंतर्गत दफनभूमी व स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवणे तसेच तालुक्यातील डोंगरकठोरा येथील स्मशानभूमीमध्ये नवीन बांधकाम करणेचा प्रस्ताव सादर करणे,१७ सप्टेंबर रोजी चिखली बुद्रुक येथे महासमाधान शिबिर आयोजित करण्यात येईल.शेतकरी आत्महत्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची अडचण सोडवणे तसेच महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेऊन विध्यार्थ्यांना विविध उपयोगी दाखल्यांचेज्ञ वितरण करणे.सामाजिक अर्थसहाय योजनेअंतर्गत प्राप्त महिन्यातील दुसऱ्या व तिसऱ्या मंगळवारी प्राप्त प्रकरणे निकाली काढणे या कामांचा सेवा पंधरवाड्यात समावेश आहे त्यामुळे नागरिकांचे विविध प्रश्न निकाली निघणार असल्याचा आत्मविश्वास तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी व्यक्त केला आहे.या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार,विविध विभागाचे नायब तहसीलदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.