Just another WordPress site

यावल आगारातील भंगार बसेसमधून जिवघेण्या प्रवासाकडे परिवहन प्रशासनाचे दुर्लक्ष !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार

सर्वसामान्य प्रवाशांच्या जिव्हाळ्याची असलेली व आवडत्या लालपरी बसेसची अवस्था अतिश्य वाईट झाली असुन यावल आगारातील भंगार बसेस मधुन प्रवाशांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.परिणामी एसटी महामंडळ हे मोठया अपघाताची वाट बघत आहे का ? अशी संत्पत प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत असुन लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा प्रवाशी वर्गातुन व्यक्त करण्यात येत आहे.

यावल एसटी महामंडळाच्या आगारात जवळपास ४० ते ४५ एसटी बसेस या नादुस्त व भंगार झालेल्या असुन या एसटी बस गाडयांचे वारंवार बसेस पेटणे किंवा ब्रेक फेल होवुन अपघात होणे या घटना होत असुन सुदैवाने आज पावेतो घडलेल्या एसटी बसच्या अपघात घटनांमध्ये अद्यापपर्यंत प्रवाशांची मोठी जिवितहानी झालेली नाही व असे असले तरी प्रवाशांना आपला जिव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत असुन या गंभीर प्रश्नाकडे एसटी परिवहन महामंडळाने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी करीत आहे.यावल एसटी आगातील नादुरूस्त व भंगार झालेल्या बसेसचा मुद्दा हा सातत्याने ऐरणीवर येत आहे.सर्वात सुरक्षित वाटणारा आपल्या लालपरीचा प्रवास हा धोकादायक वाटू लागला असून यावल आगाराचे व्यवस्थापक यांना परिवहन मंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.परिवहन मंडळाने या प्रवाशांशी निगडीत असलेल्या या अतिशय गंभीर प्रश्नाकडे विभागीय नियंणत्रक यांनी तात्काळ लक्ष देवुन यावल बस आगारातींल नादुरुस्त व भंगार बसेसचा जिवघेणा प्रवास कायमचा बंद करावा अशी मागणी प्रवाशी वर्गातुन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.