Just another WordPress site

क्राईम रिपोर्ट : भुसावळ येथे तरुणाची क्रूर हत्या तर एक जखमी !! खुनाने परिसर हादरला

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ सप्टेंबर २५ शनिवार

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळ शहरात आज रात्री पुन्हा हिंसाचाराचा थरार घडला असून शहरातील अयान कॉलनी परिसरात काल दि.१२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समद इस्माईल कुरेशी (वय ३५) या तरुणाची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे तर या घटनेतील एक जण जखमी झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.सदरहू  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदरील खुनामुळे परिसर हादरला आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,शहरातील अयान कॉलनी भागातील जाम मोहल्ला परिसरात काल दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमाराला समद इस्माईल कुरेशी या तरुणावर अज्ञातांकडून हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली तर या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.सदर घटनेतील जखमी तरुणाला तातडीने भुसावळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या भीषण घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सखोल चौकशी सुरू केली. दरम्यान डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राहूल वाघ पुढील तपास करत आहेत.पोलीसांनी घटना स्थळाची सुरक्षितता सुनिश्चित करत घटनास्थळाचे फोटोग्राफीकरण तसेच सखोल पंचनाम्याची कार्यवाहीस सुरुवात केली आहे.याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लवकरच उघडकीस येण्याची अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान सदरील खुनाच्या घटनेमुळे परिसरातील स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.