Just another WordPress site

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पराभव करेल?-पृथ्वीराज चव्हाण

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.राहुल गांधी यांच्या’भारत जोडो’पदयात्रेचा परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल त्याची प्रचिती पंतप्रधान मोदी यांची लोकसभा निवडणुकीत पराभव होण्यात होईल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.दि.२४ रोजी सोमवारी साताऱ्यातील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेसंदर्भात भाष्य केले.राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे ही पदयात्राच मोदींच्या पराभवाचे कारण ठरेल असे चव्हाण यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल त्यासाठी काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली व मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले त्यामुळे काँग्रेसला नवी उभारी मिळेल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिले होते. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.