नंदुरबार-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे लोकार्पण केले दरम्यान शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणे पार पडली यावेळी भाषणातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.त्यांनी ठाकरे गटावर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.शिंदे-फडणवीस सरकारने जर ठाकरे सरकारच्या तुलनेत पाचपट अधिक कामे केली नसतील तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे असे विधान गुलाबराव पाटलांनी यावेळी केले.तसेच सर्वसाधारण माणसात फिरणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची प्रतिमा आहे याचे मूळ कारण म्हणजे सोन्याचा चमच्या घेतलेल्या माणसाच्या घरी आम्ही जन्माला आलो नाही अशी टीका गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.शिंदे गटातील आमदार नाराज असून यातील २२ आमदार आमच्या संपर्कात आहे असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला आहे.
मागील महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्षे आणि आमचे ९० दिवस याचा विरोधकांनी हिशोब लावावा तुमच्यापेक्षा पाचपट कामे जर या सरकारने केली नसतील तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे असे आव्हान यावेळी गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिले.एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे,गुलाबराव पाटील टपरी चालवायचा असे सर्वसाधारण रिक्षावाले,टपरीवाले,बँडवाले यांचे हे पथक असलेले सरकार आहे. सामान्य माणसाला काय लागते हे जाणणारे हे सरकार आहे असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.