Just another WordPress site

डोंगर कठोरा जि.प.शाळेत सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.३१ ऑक्टोबर २२ सोमवार रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असा संयुक्तिक कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी सरपंच नवाज तडवी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी केले.प्रसंगी सरपंच नवाज तडवी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा धनश्री धनगर,शिक्षक तज्ञ सदस्य अनिल पाटील,खुशाल कोळी,ग्रामपंचायत सदस्य व शाळाव्यवस्थापन समिती सदस्य दिलीप तायडे मुख्याध्यपिका विजया पाटील यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.