महाराष्ट्राच्या प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा कारभार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला पाहिजे !
शिवसेनेच्या (ठाकरे गट) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची खोचक टिप्पणी
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
बच्चू कडू यांच्यावर सवंग,उथळ आणि बेजबाबदार आरोप करणाऱ्या रवी राणा यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या (ठाकरे गट) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांचा राजीनामा घेतला नाहीतर बच्चू कडू यांच्याविरोधात पडद्यामागून वेगळे कारस्थान सुरु असल्याचा संदेश जाईल असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.त्या आज दि.०१ नोव्हेंबर मंगळवार रोजी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.यावेळी सुषमा अंधारे यांना रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाविषयी विचारणा करण्यात आली त्यावर सुषमा अंधारे यांनी म्हटले की,रवी राणा यांनी नुसती माघार घेऊन कसे चालेल ! मला वाईट वाटते बच्चू कडू आमचा भाऊ आहे व रवी राणा त्यांचा अशाप्रकार अपमान करु शकत नाहीत रवी राणा यांनी अक्षम्य चूक केलेली आहे.तुम्ही एका मान्यताप्राप्त लोकप्रतिनिधीचे प्रतिमाहनन करता त्याच्या प्रतिमेला आणि विश्वासर्हतेला तडा जाईल अशी वक्तव्ये करता त्यामुळे अशी सवंग,उथळ आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सदस्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्याची जबाबदारी राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे.विधानसभेत रवी राणा यांची आमदारकी रद्द करण्याचा ठराव मांडला पाहिजे. फक्त माफीने काम चालणार नाही.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी असा समज होईल की तुमचं पडद्यामागून वेगळे कारस्थान सुरु आहे असे अंधारे यांनी म्हटले आहे.
सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत परिणामी महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू आहे व यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे.मात्र मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळे करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत याचे वाईट वाटत आहे.आता महाराष्ट्राच्या प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा कारभार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला पाहिजे अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली.