यावल शहरातील घरफोडीच्या सत्रामुळे शहरवाशियांमध्ये भितीचे वातावरण
रात्रीची गस्त वाढविण्याची शहरवासीयांची मागणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
सध्या परिसरातील वाढती थंडी व दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन बाहेरगावी गेलेल्या नागरीकांच्या बंद घरांना या अज्ञात चोरटयांनी लक्ष केले आहे.यावेळी शहरात विविध पाच ठीकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडल्यामुळे चोरटे सक्रीय झाल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवुन लक्ष घालणे गरजे असल्याचे मत शहरवाशियांमधून व्यक्त केले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,मागील दोन दिवसात यावल शहरातील गणपतीनगर मध्ये राहणारे अरमान तडवी(वायरमन),बालाजी सिटीमधील कल्पना कुंभार व गजानन सिटीमधील भाजीपाला विक्रेते नेहते व बंद असलेले दयानगर परिसरातील प्रजापती ईश्वरीय कार्यालयासह विस्तारीत वसाहती मधील नागरिक हे दिवाळी निमित्ताने सुटीचे दिवस असल्याने तसेच थंडीची चाहुल लागल्याने वसाहती मधील रहीवासी हे चोपडा,दोंडाईचा व इतर ठीकाणी गावाला गेल्याने त्यांचे बंद अज्ञात चोरटयांनी फोडले असुन या सर्व चोरीच्या प्रकारात एका घरातुन सुमारे १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहे.तसेच इतर ठीकाणी झालेल्या घरफोडीच्या ठिकाणी नागरीकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे दिसुन येत आहे.मागील दोन दिवसाच्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात चोरटे सक्रीय झाल्याचे दिसुन येत आहे.वाढत्या घरफोडीच्या घटनामुळे नागरीकांमध्ये भिती व असुरक्षत्रेची भावना निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने शहरासह विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी शहरवाशियांमधून होत आहे.काही दिवसापुर्वी फैजपुर मार्गावरील एका गोदामाला चोरटयांनी लक्ष केले होते त्या चोरीचा तपास अद्याप लागला नसतांना पुन्हा शहरात पाच ठीकाणी घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.