Just another WordPress site

बच्चू कडू व रवी राणा यांच्यातील वाद म्हणजे हिश्श्याचा वाद-नाना पटोले यांचा खोचक टोला

अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

बच्चू कडू व  रवी राणा यांचा वाद म्हणजे हिश्श्याचा वाद आहे असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.नाना पटोले हे अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथे असताना माध्यमांशी बोलत होते.या दोघांचे हे हिश्श्याचे भांडण आहे.महाराष्ट्राचा शेतकरी असो, महाराष्ट्रातील बेरोजगार असो,गरीब माणूस असो,वा उद्योग असो यासंदर्भात कुठलीही चर्चा केली जात नाहीये अशी टीका नाना पटोले यांनी केली.आता हा हिस्सा वाटायचा प्रश्न आहे कारण आपण पाहिले असणार ५० खोकेवरीची चर्चा.आता ५० खोके अन महाराष्ट्राची जे काही बदनामी झालेली आहे हे जगजाहीर आहे.जर सत्तेमध्ये बसलेली आमदार ५० खोक्यांसाठी भांडत असतील,आरोप प्रत्यारोप करत असतील, पण त्याच्यापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत म्हणून यापेक्षा आम्हाला या दोघांच्या भांडणावर लक्ष देण्याचे काही कारण नाही असेही पटोले म्हणाले.

अकोला जिल्ह्यात सलग खुलेआम हत्येच्या घटना घडत आहेत यामध्ये शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुखावर गजबजलेल्या भर चौकात चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली. जिल्ह्यात प्राणघातक हल्ले होतायत यावरही नाना पटोले बोलले.देवेंद्र फडणवीस आता सुपरमॅन आहेत ते सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.जमत नाही एवढे सारे करून ठेवले काय?राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बरोबर नाही.लोकांचे जीवन धोक्यात आले आहे असे म्हणत पटोले यांनी निशाणा साधला.अकोल्यासारख्या शहरात खुलेआम दोन हत्या झाल्या.अजूनही शिंदे गटातील उपशहर प्रमुखाच्या हत्याच गुढ उकलण्यात यश आलेल नाही मारेकऱ्यांना पकडू शकले नाहीत.दरम्यान राज्यामध्ये जी काही कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे यात कुठेही सरकारचे लक्ष नाही फक्त सरकार जनतेचे पैसे जे राज्याच्या तिजोरीमध्ये आहे ते पैसे लुटण्यासाठी हे सरकार बनलेले आहे.भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टीच्या आधारावर महाराष्ट्रातले भ्रष्ट,ईडीचे सरकार निर्माण झालेले आहे ते फक्त लूटपाट करण्यासाठी लोकांच्या सुरक्षेसाठी नाही असाही आरोप नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.