नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.येत्या काही दिवसांमध्ये भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे मात्र त्यापूर्वी तेलंगणामध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील एका नेत्यासोबत दुर्दैवी प्रसंग घडला आहे.राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.नितीन राऊत हे यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते.राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागत होते.पोलीस लोकांना राहुल गांधी यांच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते यावेळी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले या सगळ्या गदारोळात नितीन राऊत यांच्या डोळ्याला जबर मार बसला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना ढकलले तेव्हा ते जमिनीवर आपटले यावेळी त्यांचे डोके जमिनीवर आपटणार होते त्यापासून वाचण्यासाठी नितीन राऊत यांनी डोक्याभोवती हात ठेवला होता मात्र या नादात त्यांचा चेहऱ्याला मार लागला असून त्यांच्या उजव्या डोळ्याला जबर मार लागला असून डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेला आहे त्यामुळे त्यांचा डोळा अक्षरश: काळानिळा पडला होता त्याचबरोबर त्यांच्या हातापायालाही खरचटले आहे यानंतर नितीन राऊत यांना उपचारासाठी हैदराबादच्या बासेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे,के.सी.वेणुगोपाल,के.राजू यांच्यासह प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली तर राहुल गांधी यांनी नितीन राऊत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला यावेळी राहुल यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मंगळवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला.डॉक्टरांनी नितीन राऊत यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा डोळा आणि कानाच्या मधील भागात फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले असून यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहे.नितीन राऊत यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडले जाईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.