मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
प्रहारचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद मागील १५ दिवस राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील आरोप प्रत्यारोप विकोपाला गेले होते.रवी राणांनी ३१ ऑक्टोबरला तर बच्चू कडू यांनी काल वादावर पडदा टाकला.बच्चू कडू आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आपापल्या तलवारी म्यान केल्या.बच्चू कडू यांनी घेतलेल्या माघारीनंतर दुसऱ्या दिवशीच बच्चू कडू यांना शिंदे फडणवीस यांच्याकडून विशेषत: देवेंद्र फडवीस यांच्याकडून रिटर्न गिफ्ट मिळाले आहे.बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला ४९५.२९ कोटींची सुधारीत मान्यता देण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मविआ सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते.नवे सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिपदी संधी मिळेल अशी त्यांना आशा होती.पहिल्या विस्तारात बच्चू कडू यांना संधी मिळाली नव्हती त्यानंतर रवी राणा यांनी गुवाहाटीच्या संदर्भाने पैशांचा आरोप केल्याने बच्चू कडू आक्रमक झाले होते. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाचा विषय राज्यभर चर्चेचा ठरला होता.एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू एक पाऊल मागे घेतले होते.आता शिंदे फडणवीसांनी कडूंना रिटर्न गिफ्ट दिले आहे. अचलपूर सपन प्रकल्पाला ४९५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्प ४९५.२९ कोटींची सुधारीत मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ६१३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प बच्चू कडूंच्या मतदारसंघातील आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय
• ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना.अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांमध्येही विकास कामांसाठी निधी (आदिवासी विकास विभाग)
• राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास मान्यता. (महिला व बाल विकास विभाग)