डोंगर कठोरा येथील ग्रामसभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा
ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना धरले धारेवर
यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.३० रोजी मागील तहकुब ग्रामसभा विविध कार्यकारी सोसायटी प्रांगणात सरपंच नवाज तडवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या ग्रामसभेत विविध विषयांवर ग्रामस्थांनी सरपंच नवाज तडवी व ग्रामविकास अधिकारी एम.टी.बगाडे यांना चांगलेच धारेवर धरले.तसेच यावेळी इतर विविध विषयांवर देखील जोरदार चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत शेती स्वामित्व जमीनीच्या जमा खर्चाचे विवरण,केक बनविण्याच्या योजनेचा खर्च तपशील,जिल्हा परिषद मराठी शाळेतील जीर्ण झालेल्या लिव्हिंग सर्टिफिकेटचे पुनरुज्जीवन करणे,डोंगर कठोरा शिवारातील डोंगरदा वनविभागात असलेल्या सलई व धामोडी डिंक विक्री,बहुतेक सर्व सरकारी कर्मचारी हे बाहेरगावी राहात असल्याने त्यांनी कामाच्या ठिकाणी मुक्कामी थांबावे,मनरेगा कामाअंतर्गत मजुरांची विविध कामांबाबत तजवीज करणे तसेच रस्ते,लाईट व गटारींच्या समस्या अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी एम.टी.बगाडे,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,ग्रामपंचायत सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,ऐश्वर्या कोलते, शकीला तडवी,शबनम तडवी,ग्रा.पं.क्लर्क प्रदीप पाटील,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक दिवाकर सरोदे, पशु चिकित्सक पवार,विज लाईनमन अमीन आर.तडवी,विज सहाय्यक माधव टोके,ललित बऱ्हाटे,उमेश पाटील,रवींद्र भोई,ग्रामस्थ छब्बीर तडवी,राहुल आढाळे,पदमाकर कोळी,रमेश आढाळे,मुस्तफा तडवी,योगेश ठोंबरे,लालचंद झोपे,शंकर वारके,सुपडू तडवी,शरद बाऊस्कर,प्रवीण मेघे,समाधान तायडे,रबील तडवी,डिगंबर खडसे,विजय झोपे,लुकमान तडवी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.