सगळे मतभेद सोडून एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे-नवनीत राणा
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात नवनीत राणा यांची मध्यस्थी
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख:-
भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने शमला खरा मात्र त्यानंतर दोन्ही बाजूंकडून तो पुन्हा भडकताना दिसत आहे.या वादावर अमरावतीच्या खासदार आणि रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.रवी राणा व बच्चू कडू या दोघांना विनंती आहे की आधीच अडीच वर्ष आपल्या जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे दोघांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित यायला पाहिजे.आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत अशी विनंती नवनीत राणा यांनी दोघांना केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील दोन्ही आमदार बच्चू कडूजी व आमदार रवी राणाजी यांच्यात जे गैरसमज आणि विसंवाद आहे जे मतभेद चार पाच दिवसांपासून सगळे जण पाहत आहेत.मी अमरावती जिल्ह्याची खासदार या नात्याने दोघांना विनंती करते की गेली अडीच वर्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्याचे मोठे नुकसान झालेले आहे.आता सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत,एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहेत तर मी कडू आणि राणा यांना जिल्ह्यातील लोकांच्या वतीने आग्रह करेन की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काम केले पाहिजे असे नवनीत राणा म्हणाल्या.गेली अडीच वर्ष आपले अनेक प्रश्न रखडले होते त्यामुळे ते पूर्ण करुन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे म्हणून एक खासदार या नात्याने मी दोन्ही आमदारांना विनंती करेन की सगळे मतभेद सोडून एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे त्यासाठी विचार केला पाहिजे अशी विनंतीही खासदार नवनीत राणा यांनी केली.याआधी देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवल्यानंतरही बच्चू कडू यांनी समर्थकांचा मेळावा घेत पुन्हा वैयक्तिक आरोप केल्यास कोथळा बाहेर काढू असा इशारा दिला होता त्यावर रवी राणांनीही आक्रमक वक्तव्य करत ‘बच्चू कडू पुन्हा आमदार कसा होणार ते पाहा’ असे आदेश कार्यकर्त्यांना दिले त्यानंतर हा वाद पुन्हा चिघळला.रवी राणांच्या आव्हानाचा बच्चू कडू यांनीही समाचार घेतला. ‘घरात घुसून मारू, निवडणुकीत पाडू,असे आवाहन रवी राणा यांनी दिल्याचे मी मीडियावर पाहिले.रवी राणा यांना मला मारायचे असेल तर मी ५ तारखेला घरी आहे तेव्हा त्यांनी तलवार घेऊन माझ्या घरी यावे मी मार खायला तयार आहे मी राणा यांच्या तलवारीचा वार छातीवर झेलेन,’ असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.
आता या प्रकरणात खुद्द रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मध्यस्थी केलेली असल्याने या दोन्ही आमदारावर या मध्यस्थीचा काही फरक पडून हा वाद कमी होतो की पुन्हा वाढतो याकडे तमाम जनतेच्या नजरा लागून आहेत.