Just another WordPress site

मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-राजू शेट्टी यांची घणाघाती टीका

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे.“महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघांनीही शेतकऱ्यांना फसवले आहे.सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना विसरायचे आणि सत्ता गेली की शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचे असे सत्ताधारी आणि विरोधक करत आहेत असे शेट्टी यांनी म्हटले आहे.संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात शेट्टी यांनी महत्वाच्या मागण्याही केल्या.
यावेळी ते म्हणाले की यावर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी अधिक 350 रुपये आणि मागील वर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक 200 रुपये देण्यात यावेत.काटामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संगणकीपद्धतीने असणारे काटे डिजिटल करून ते ऑनलाइन करावेत.या सरकारने आता 23 पिकांना हमीभाव जाहीर करावा यासाठी देशपातळीवर सर्व संघटना एकत्र येऊन हमीभावाचा कायदा करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. एकीकडे अतिवृष्टीने ऊस पीक सोडल तर सर्व पिकांचे नुकसान झाले आहे मात्र मुख्यमंत्र्यांची शेती पाहून मी प्रभावित झालो.त्यांची शेती कशी पिकली असे कोडे मला उलघडलेले नाही असे शेवटी शेट्टी यांनी म्हटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.