मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे तो म्हणजे मोठ्या स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर कमी केले आहेत. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटांचा दर वाढवला होता.रेल्वेने मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली होती.तसेच अनेक स्टेशनवर तिकीट दर १० रुपयांवरुन ३० ते ३५ रुपये केले होते या निर्णयाला प्रवाशांनी विरोध केला होता.त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.प्लॅटफॉर्मवरील गर्दी रोखण्यासाठी २०१५ साली रेल्वे मॅनेजरकडे रेल्वे प्रशासनाने हे अधिकार दिले होते.रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे आता डीआरएमला प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढवता येणार नाहीत यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीमुळे स्टेशवर उगाचच येणाऱ्यांची संख्या घटेल असा विश्वास रेल्वेला होता यामुळे सीएसएमटी,दादर,एलटीटी,ठाणे,कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर ५० रुपये दर केले होते.
प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यामागे विशेष कारण चेन पुलिंगच्या घटना देखील होत्या.एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडल्या यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतेही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरप्रकारांमुळे अनेक एक्सप्रेस रेल्वे उशिरा धावल्या शिवाय इतर प्रवाशांनाही नाहक त्रास सहन कारावा लागला असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दर कमी झाल्यास याचा फायदा प्रवाशी वर्गाला निश्चितच होणार आहे.