मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ७५ वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करायला मिळणार आहे.याबाबत शासन निर्णय पत्र क्र:एसटीसी-०८२२/प्रक्र .२२०/परि-१ नुसार आशिष कुमार सिंह अप्पर मुख्य सचिव यांनी जरी केला आहे.यामुळे जेष्ठ नागरिकांना बसने प्रवास करणे फारच सुकर व लाभकारक झाले आहे.
महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करणेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिकांना राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करायला मिळणार आहे.तसेच ६५ वर्षांपासून ७५ वर्षापर्यंतच्या जेष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० टक्के (अर्धे तिकीट)प्रवास सवलत दिली जाणार आहे.या निर्णयाचे जेष्ठ नागरिक वर्गातून स्वागत केले जात आहे.याबाबतची प्रक्रिया शासन स्तरावरून सुरु करण्यात आली असून लवकरच याची अंमलबजावणी संपुर्ण राज्याकरिता केली जाणार आहे.