Just another WordPress site

यावल शहरातील एकाची निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

शहरातील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर कचरे वय ५२ वर्ष धंदा मजुरी हे आपल्या कुटुंबासह राहत असून दि.५ रोजी आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शोभाबाई कचरे यांना जाग आल्याने त्यांना राजेन्द्र कचरे हे खाटीवर मिळवुन आले नाही तेव्हा त्यांचा शोध घेतले असता तेव्हा कचरे हे आपल्या घरा समोरील धनगरवाडयातील स्वस्त धान्य दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या निंबाच्या झाडाला दोरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसुन आले आहे.

याबाबत मयत राजेन्द्र कचरे यांचा मुलगा धनराज राजेन्द्र कचरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.मयत राजेन्द्र कचरे यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले.घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.यावल तालुक्यातील आठवडयाभरातील आत्महत्या करण्याची ही पाचवी घटना आहे हे विशेष.मात्र या आत्महत्यांच्या मालिकांमुळे सर्वत्र चर्चचा विषय ठरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.