मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.ऋतुजा लटके यांनी निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांची भेट घेतली यावेळी सेना नेते अनिल परब देखील उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरेंनी यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि इतर हितचिंतक यांनी मेहनत घेतली त्या सर्वांना धन्यवाद देतो ही सुरुवात झाली आहे लढाईची सुरुवात विजयाने झाली आहे त्यामुळे भविष्यातील लढाईची चिंता नाही.आपण या लढाईत विजय एकजुटीने खेचून घेतला.पुढील लढाईत देखील विजय खेचून घेऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले.आमचे नाव गोठवले,चिन्ह गोठवले या निवडणुकीच्या निमित्ताने चिन्ह गोठवले ज्यांच्या मागणीवरुन गोठवले ते निवडणुकीच्या जवळपास आले नाहीत.या सर्वाचे कर्ते करविते आहेत त्यांनी अर्ज भरला पुन्हा मागे घेतला त्यांनी जर उमेदवार दिला असता तर त्यांच्या उमेदवारांना नोटाला आहेत तितकीच मते मिळाली असती असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक चिन्ह महत्त्वाचे आहे चिन्ह कोणतेही असले तरी जनता आमच्या सोबत आहे असे स्पष्ट झाले आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. विजयाचे श्रेय शिवसैनिक,कार्यकर्ते यांच्यासह पाठिंबा देणाऱ्यांचे आहे.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,संभाजी ब्रिगेड,कम्युनिस्ट पक्ष,वंचित आघाडी आणि इतर पक्षांचे आभार मानतो.आगामी निवडणुका देखील आम्ही अशाच प्रकारे जिंकू असे उद्धव ठाकरे म्हणाले.हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जे घडते आहे ते संपूर्ण राज्य उघड्या डोळ्यांनी पाहतोय.शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. विरोधकांनी माघार घेतली त्यामुळे उत्साहावर पाणी पडले मात्र मशाली भडकल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.निवडणुका समोर ठेवून केंद्र सरकार घोषणा करत असते.महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातला नेण्यात आले.गुजरात निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी प्रकल्प जाहीर केले जात आहेत त्यामुळे मध्यावधी निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.भारत जोडो यात्रेत आमचे ज्येष्ठ नेते सहभागी होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.