Just another WordPress site

कोरपावली येथे विविध विकास कामांचे आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे कामास माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते स्थानिक विकास निधी विकास कामाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपावली गावातील विकास कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.कोरपावली गावामध्ये चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आ.लताताई सोनवणे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.सदरील काम हे गावातील पाटील वाडा परिसरात करण्यात येत असून अंदाजित किंमत ही ५ लक्ष खर्च अपेक्षित आहे.

या कार्यक्रमाला कोरपावली सरपंच विलास अडकमोल,मोहराळा सरपंच नंदा गोपाळ महाजन,ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी,आरिफ तडवी,जुम्मा तडवी,शाखा अध्यक्ष भरत चौधरी शाखा उपाध्यक्ष प्रविण अडकमोल,अविनाश अडकमोल,भिमराव इंधाटे,किसन तायडे,समाधान अडकमोल, मनोज अडकमोल,अजय अडकमोल,उमेश जावळे,गजानन कोळी,सूर्यभान पाटील,भरत चौधरी यावल,प्रकाश कोळी,समाधान कोळी,अरुण भालेराव,विक्की अडकमोल,सचिन भालेराव,माजी ग्रा. पं. सदस्य राजू पाटिल,दत्तात्रय महाजन,युगल पाटील,प्रमोद महाजन,विनायक पाटील यांच्यासह  महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.या विकास कामाच्या प्रसंगी आमदार सौ .लताताई सोनवणे तसेच माजी आ.चंद्रकांत सोनवणे व उपस्थित मान्यवरांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सरपंच विलास अडकमोल यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.