जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
बनावट कागदपत्रांद्वारे पिंप्राळा शिवारात एक हेक्टर ६९ आर भूखंडाची खरेदी व विक्री केल्याप्रकरणी माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध अशोक राणे (वय ६३,रा.भोईटे नगर) यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक (३३८/१ क्षेत्र ६६ आर व गट क्रमांक ३३९ अ क्षेत्र ९५ आर) एकूण १ हेक्टर ६९ आर भूखंडाची विक्री झाली आहे या जमिनीची किंमत ५ ते ६ कोटी रुपये असून १३ मार्च ते १९ जुलै २०१३ या कालावधीत बनावट कागदपत्र तयार करून सह धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयात सादर केले.हा भूखंड विक्री करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या हिताचे आदेश पारित करून धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्याने अजगर अजिज पटेल (रा. भादली बुद्रुक, ता. जळगाव),गुरुमुख मेरुमल जगवाणी,हरीष ए.मतवाणी,नीलेश विष्णू भंगाळे,विठ्ठल गलाजी सोळुंके,मीना विठ्ठल सोळुंके व एच.ए.लोकचंदाणी(सर्व.रा.जळगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी विधानपरिषद सदस्य गुरुमुख जगवाणी २००४ ते २०१० आणि २०१४ ते २०१६ या कालावधीत विधान परिषदेचे आमदार होते.वर्ष-२०१६ नंतर सुद्धा त्यांना पोलिस दलातर्फे अंगरक्षक सुरक्षा पुरवण्यात आली होती मात्र माहिती अधिकारात ६ ऑक्टोबर रोजी जगवाणी यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेची माहिती मागितली होती त्यानुसार १४ ऑक्टोबर रोजी शासन आदेशानुसार जगवाणी यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे.