परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्याचे कृषिमंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील राष्ट्रवादी भवन समोर अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले.यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.राज्याचे कृषिमंत्री यांनी सिल्लोड येथील एका सभेच्या आढावा बैठकी दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पाथरी तालुका पदाधिकाऱ्यांनी आज रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मंत्री महोदयांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोडे मारले.यावेळी कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मांयदळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष संदीप टेंगसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख खालेद,तालुकाध्यक्ष विष्णू काळे,आयटी सेल जिल्हाध्यक्ष अमोल भाले पाटील,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अहमद अत्तार, सरपंच वैजनाथ महिपाल,सरपंच श्याम धर्मे,विक्रम गायकवाड,माजी नगरसेवक सतीश वाकडे,उपसरपंच गणेश काळे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.