Just another WordPress site

जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

राज्यात गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे अशातच चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून शीर धडावेगळे करण्यात आले आहे.भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर निवासी परिसरात ही घटना घडली आहे.महेश मेश्राम असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.महेश मेश्राम याच्यावर ३ ते ४ जणांनी मिळून हा प्राणघातक हल्ला केला आहे.आरोपीनी आधी महेश मेश्राम याला बेदम मारहाण केली त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचे शीर धडावेगळे करून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. महेश मेश्राम याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तर शीर काही अंतरावर पडलेले होते.

मृत महेश मेश्राम याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची होती त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता.आरोपी आणि मृत महेश यांच्यात नेमका कशामुळे वाद झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही.पोलिसांनी या प्रकरणी २ संशयित आरोपीना अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.