यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रीयाताई सुळे यांच्या बद्दल राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्या बद्दल त्यांच्या निषेर्धात यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रा .मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली आज दि.८ रोजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात येवुन त्यांच्या पुतळ्याचे शहरातील भुसावळ टी पाँईटवर दहन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे एम बी तडवी,अॅड देवकांत पाटील ,माजी नगराध्यक्ष राकेश कोलते ,जिल्हा पदाधिकारी विजय प्रेमचंद पाटील,डॉ हेमंत येवले,अय्युब खान सर,खरेदी विक्री संघाचे माजी संचालक प्रशांत चौधरी,नरेन्द्र शिंदे,कामराज धारू,अरूण लोखंडे,आरीफ खान,हितेश गजरे, अब्दुल सईद शेख,मोहसीन खान,एजाज देशमुख,समाधान पाटील यांच्यासह असंख्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते .