एकनाथ शिंदे हे शिवसेनेतुन बाहेर पडल्यापासून शिवसेनेला जी गळती सुरु झाली आहे ती थांबण्याचे अजूनही नाव घेत नाही.यात अनेक पदाधिकारी नेत्यांचे प्रमाण मोठे आहे.हि शिवसेनेची होत असलेली गळती रोखण्याचे महत्वाचे आवाहन सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर आहे.हि गळती रोखण्याकरिता आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्यभरामध्ये दौरे काढले जात आहेत.यापरिस्थितीत शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केली असल्याने या युतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.सदरील युती हि विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला असून खरी शिवसेना हि शिंदे गटाचीच असल्याबाबत दावा केला जात आहे.
दसरा मेळाव्याबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि,गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या वतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते मात्र यंदा शिवाजी पार्क वर दसरा मेळावा कोण घेणार याबाबत मी अन्यभिज्ञ असून याबाबत मला कुठलीही कल्पना नसल्याचे नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.तर मेळाव्याबाबत गृहमंत्री नियमानुसार काय निर्णय घेतात त्याची अमलबजावणी होईल.देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर दौऱ्यावर असल्याने त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी सदरील प्रतिक्रिया दिली आहे.