जळगाव ग्रामीणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रमेश माणिक पाटील यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सोमवारी दि.७ रोजी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील,उमेश रावसाहेब पाटील,प्रवीण कौतिक पाटील,छोटू सुकदेव पाटील,भाऊसाहेब सुकदेव सोनवणे,डॉ.जुबेर खान,चेतन पुंडलिक सोनवणे यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत,सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील,उपमहापौर कुलभूषण पाटील,विरोधी पक्षनेते सुनील महाजन,युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी,जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे,उपजिल्हा प्रमुख ॲड.शरद माळी,उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.शिवसेना घराघरांत पोहोचविण्याचे कार्य करावे असे अवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.