Just another WordPress site

दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले या धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली तर भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये भूकंपामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे.राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती.

या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या मणिपूर इथे जमिनीपासून १० किलोमीटर खोल असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर भारतात ५ तासांमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी मंगळवारी रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी लखनौसहित उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.