जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शहरातील रस्त्याची समस्या अतिशय गंभीर आहे त्यासाठी शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे सदरील निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे त्यातील काही निधी प्राप्तही होत आहे त्यासोबत आपण रस्त्याच्या कामांचाही पाठपुरावा करीत आहोत.दहा रस्त्यांच्या कामांबाबत आपण अधिकाऱ्यांना जाब विचारला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे.जळगाव शहर विधानसभा क्षेत्र असल्याने शहरातील विकासाकडे आपण लक्ष देत आहोत असे मत व्यक्त करून आमदार सुरेश भोळे म्हणाले की शहरातील समस्यांबाबत आपण महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो त्यांच्याकडून विकासाबाबत माहिती घेतो याशिवाय शासनाकडून उपलब्ध होत असलेल्या निधीचीही आपण माहिती घेत असतो.
शहरात विविध समस्या असल्याचे मत व्यक्त करून आमदार भोळे म्हणाले की शहराचा विकास हेच आपले एकमेव लक्ष्य आहे त्यासाठी आपण २५.१५ चा निधी,अल्पसंख्याक निधी तसेच विशेष निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तो निधी उपलब्ध करण्यासाठी आपला सतत पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे अगोदर पाच कोटी आणि आता आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे पुढचा निधीही लवकरच प्राप्त करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.शहराच्या विकासासाठी आपण कोणताही निधी शासनाकडून कमी पडू देणार नाही.शहरात विकासकामे वेगाने होण्याची गरज आहे.महापालिकेतील अधिकाऱ्यांनी त्याबाबत गतीने काम करण्याची गरज आहे तसेच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आमदार भोळे यांनी व्यक्त केले आहे.