Just another WordPress site

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे.१८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील.१८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वी लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या परंतु निवडणूका जाहीर झाल्यामुळे राज्यभरात निवडणूक रणधुमाळीला वेग येणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
तहसिलदर निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : १८ नोव्हेंबर २२

अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २२
अर्ज छाननी : ०५ डिसेंबर २२
अर्ज मागं घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर २२
निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर २२ दुपारी ३ नंतर
मतदानाची तारीख : १८ डिसेंबर २२
मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर २२
निकालाची अधिसूचना : २३ डिसेंबर २२

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस जारी होईल त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत ७७५१ गावांमध्ये आचारसंहिता लागू असेल त्यामुळे या गावांमधील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा खासदार, आमदार,संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आचारसंहितेचे उल्लंघन करता येणार नाही.निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे.१८ डिसेंबर रोजी मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या काळात होईल.नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये गडचिरोली,गोंदिया मध्ये मतदान सकाळी ७.३० ते ३ पर्यंत होईल.अहमदगर,अकोला,अमरावती,औरंगाबाद, बीड,भंडारा,बुलढाणा,चंद्रपूर,धुळे,गडचिरोली,गोंदिया,जळगाव,जालना,कोल्हापूर,लातूर,नागपूर,नंदूरबार,उस्मानाबाद,पालघर,परभणी,पुणे, रायगड,रत्नागिरी,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,सोलापूर,वर्धा,ठाणे,वाशिम,यवतमाळ,नांदेड,नाशिक जिल्ह्यात ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत यामुळे डिसेंबर महिन्यात ग्रामीण महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.