Just another WordPress site

संजय गांधी योजना प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी-राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध अनुदानाच्या लाभासाठी शेकडो लाभार्थ्यांचे प्रस्ताव हे मागील अनेक दिवसांपासुन प्रलंबीत असुन या संदर्भात प्रशासनाने तात्काळ बैठक घेवुन ही सर्व प्रकरण मंजुर करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत तालुकाध्यक्ष ॲड देवकांत पाटील यांच्यासह ईतर पक्षाच्या पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की,यावल तालुक्यातील गोरगरीब व आदीवासी गरजु नागरीकांनी मागील काही दिवसांपासुन समितीच्या माध्यमातुन लाभ मिळावा याकरिता संजय गांधी निराधार योजना समितीची कडे अर्ज दाखल केले असुन त्या अर्जांचा बैठकीत तात्काळ निर्वाळा करायात यावा अशा मागणीचे निवेदन दिले आले.यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समिती या योजनेअंतर्गत मिळणारे संजय गांधी,इंदीरा गांधी भुमिहीन,श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची मार्च २०२२ पासून शासन बद्दल झाल्याने बैठक न झाल्यामुळे नवीन लाभार्थ्यांची मंजुरी न मिळाल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसून ते अनुदानापासून वंचित राहत आहेत तरी या निराधार असणाऱ्या लोकांना विधवा,ज्येष्ठ नागरिक,अपंग यांचा समावेश असतो तरी या लोकांना आपल्या उपजीविके कामे करण्याकरता अनुदानाची आतुरतेने वाट पाहत असतात व त्यांना त्या व्यतिरिक्त जास्तीचे उत्पन्नाची साधने नसतात तरी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर या संदर्भात बैठक घेऊन प्रकरण मंजूर करून जे नवीन व योग्य लाभार्थी असेल त्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून द्यावा असे आशयाचे लिखित निवेदन आज नायब तहसीलदार आर .डी .पाटील यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष ॲड देवकांत पाटील,शहराध्यक्ष हितेश गजरे,राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, सरचिटणीस हेमंत दांडेकर,संघटक शब्बीर खान( हिंगोणा )आदींची उपस्थिती होती नायब तहसीलदार यांनी तातडीने बैठक घेवुन सर्व निराधार लोकांची प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .

Leave A Reply

Your email address will not be published.