रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
रायगडमधील पेण शहरानजीक असलेल्या भोगावती नदीत तरंगती बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर संबंधित स्थानकांनी या बॉम्बसदृष्य वस्तूची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी बॉम्बसदृष्य वस्तूचा तपास केला मात्र तो डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले आहे.