पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रमांचा समावेश
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध उपकरणातून साजरा करण्याचा भाजपाचा प्लान
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ७२ वा वाढदिवस १७ सप्टेंबर २२ रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपाने देशभरात खास कार्यक्रम राबविण्याबाबत तयारी सुरु केली आहे.सदरील उपक्रम हा १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत राबविण्यात येणार आहेत.या मोहिमेवर भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आठ केंद्रीय पॅनल समितीची स्थापना करण्यात आली आहे.या उपक्रमादरम्यान रक्तदान शिबिरे,जलसंवर्धन व स्वच्छता मोहिमेबाबत जनजागृती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.असे भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी पक्षाच्या राज्य युनिटला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रानुसार जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते हे ‘विविधतेत एकता’नुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांमध्ये ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ चा संदेश देणार आहेत तसेच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम,जलसंधारण जनजागृती मोहीम,दिव्यांग व्यक्तींना उपकरणांचे वाटप,स्थानिक उत्पादनांची प्रसिद्धी,मोफत आरोग्य तपासणी शिबिरे असे विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.त्याच बरोबर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने भाजपा कार्यकर्ते व सर्वसामान्य लोकांना खादी व स्थानिक उत्पादनांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.
मागील काही वर्षांपासून भाजपा कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो.या पंधरवड्यात सर्व नेते,खासदार,आमदार आपापल्या भागात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता,वृक्षारोपण,रक्तदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात.मागील वर्षी मोदींच्या वाढदिवसाला २.५ कोटी कोरोना लसीकरण करून नवा विक्रम करण्यात आला होता.या वर्षीही समाजहितकारक उपक्रम राबवावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.