यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ शुक्रवार रोजी भारत जोडो पदयात्रा चित्ररथाचे जोरदार स्वागत करण्यात आले.यानिमित्ताने गावठाण परिसरात भारत जोडो पदयात्रेचे टीव्ही स्क्रीनवर यात्रेचा हेतू व उद्देश्य याबाबत तसेच गांधी घराण्याचे भारत राजकारणामधील योगदान व भूमिका याविषयी जमलेल्या नागरिकांना माहिती देण्यात आली.तसेच १८ नोव्हेंबर २२ रोजी भारत जोडो यात्रेनिमित्ताने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती माजी गट नेते शेखरदादा पाटील,संदिपभैय्या पाटील,अमर कोळी,उमेश जावळे,पवन राणे,डॉ,राजेंद्रकुमार झांबरे,भोजराज पाटील,लीलाधर जंगले,उपसरपंच धनराज पाटील,डिगंबर खडसे,मयूर जंगले,चंद्रकांत भिरूड,राहुल आढाळे,भास्कर पाटील,किशोर कोल्हे,गबा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.