सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगितल्यामुळे वादात सापडलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे यांनी सांगलीत आल्यानंतर टिपू सुलतानची जयंती साजरी करणे तत्काळ बंद करावे या मागणीसाठी महिला पोलिस उपअधीक्षक मनीषा डुबुले यांना निवेदन सादर केले त्यावेळी या महिला अधिकाऱ्यांनीही कुंकू लावले नसतानाही मोठ्या आदराने त्यांच्याशी भेट घेऊन आपली तक्रार दाखल केली.प्रत्येक हिंदू महिलेने कपाळावर टिकली लावली पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे यांनी दुजाभाव का केला?याची चर्चा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.संभाजी भिडे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते यावेळी ते मंत्रालयाच्या आवारात असताना एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देण्याऐवजी त्यांनी तू आधी कुंकू किंवा टिकली लाव तरच तुझ्याशी बोलेन.प्रत्येक स्त्री भारतमातेचे रुप आहे.भारत माता विधवा नाही असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर बरीच टीका झाली होती.राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संभाजी भिडे यांना नोटीस धाडली होती.
शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या भेटीमुळे लेखिका सुधा मूर्ती यांचे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे.संभाजी भिडे यांनी अलीकडेच एका महिला पत्रकाराला ‘कपाळावर टिकली लावून ये,त्याशिवाय मी बोलणार नाही’ असे म्हटले होते यावरुन भिडे यांच्यावर प्रचंड टीका झाली होती त्यानंतर सुधा मूर्ती यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांची भेट घेतली होती.वादाच्या पार्श्वभूमीवर सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांची भेट प्रचंड चर्चेचा विषय ठरली या भेटीवेळी सुधा मूर्ती संभाजी भिडे यांच्या पायाही पडल्या होत्या या कारणावरुन सुधा मूर्ती यांना टीकेला सामोरे जावे लागले होते अखेर या सगळ्या वादानंतर सुधा मूर्ती यांनी मौन सोडले होते.एका वयोवृद्ध व्यक्तीला भेटायचे आहे त्यामुळे त्यांना भेटले त्यांचे विचार काय आहेत?याचा पूर्व इतिहासही आपल्याला ज्ञात नव्हता त्यांना मी ओळखतही नाही असे सुधा मूर्ती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.त्यांचे पर्सनल मत मला माहिती नाही पण ते थोरले माणूस आहेत,ते म्हातारे माणूस आहेत, आमची संस्कृती आहे,की थोरल्या माणसाला बघितले की पाया पडायचे त्यांचे मत काय,मतभेद काय,त्यांच्याशी मी काही बोललेच नाही त्याबद्दल,असेही सुधा मूर्ती यांनी सांगितले.