स्वयंरोजगार मेळाव्यातून महिलांना दिले दुलई प्रशिक्षण
महाराष्ट्र सेना व महिला वतीने स्वयंरोजगार मेळावा उत्साहात
धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांना दुलई शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.सदरील मेळावा हा शिवतीर्थ जेष्ठ नागरिक संघ भवनात महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा शालिनी ठाकरे व सरचिटणीस रिटा गुप्ता तसेच उत्तर महाराष्ट्र मनसे पक्ष निरीक्षक व मनसे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत व्हावी या हेतूने सदरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी महिलांनी कुठलाही रोजगार हा एकत्रित व संघटीत राहून यशस्वी कसा करता येईल याची माहिती या मेळाव्यात दिली.तसेच धुळे जिल्ह्यातील महिलांना दुलई प्रशिक्षणातून आर्थिक स्वावलंबी होण्याची मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.मेळाव्याला धुळे मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यन्तराजे देशमुख,तालुकाध्यक्ष संतोष मिस्तरी व उपस्थित महिलांनी स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला मनसे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम,जिल्हाध्यक्ष दुष्यन्तराजे देशमुख,महिला सेने जिल्हाध्यक्षा संध्या पाटील,जिल्हा सचिव संदीप जडे,शहर सचिव हरीश जगताप,शहराध्यक्ष अमिषा गावडे,उपशहराध्यक्ष निशा पाटील,चारुशीला खैरनार,गीतांजली पाटील यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.मेळावा यशस्वीतेकरीता मनसे विभागीय अध्यक्ष सतीश पाटील,हरीश जगताप व रोहित नेरकर यांनी परिश्रम घेतले.